अधिक माहिती
राज्यात नवीन संकल्पनांचा आराखडा तयार करणे, नवीन संकल्पनांचा शोध घेण्यासाठी शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे व अन्य संशोधन संस्थांमधून विद्यार्थी व तरुणांना मार्गदर्शन करणे, उद्योजकांना जोखीम भांडवल उभारणीसाठी मदत करणे, आदी जबाबदारी परिषदेकडून पार पाडण्यात येणार आहे. सर्व जिल्ह्य़ांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नाविन्यता परिषदा स्थापन केल्या जातील. संदर्भीय शासन निर्णय क्रमांक एसआयसी 2113/प्र.क्र.1/2013/1471 दिनांक .4 मार्च , 2014 अन्वये राज्यात स्टेट इनोव्हेशन कौन्सिल ची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात नवीन संकल्पनेचा आराखडा तयार करुन या संकल्पनांना मूर्तिरूप देण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती करणे, तसेच त्यासमबंधीत प्रचार व प्रसार करण्यास सहाय्य करणे, नवीन संकल्पनांचा शोध घेण्यासाठी स्थनिक शाळा , विद्यपीठे तथा संशोधन संस्थातील विद्यार्थ्यंना मार्गदर्शन करण्यात येणार आहे .