• माध्यमिक शाळेत अभ्यासिका सुरु

  • गाव ते शाळा दरम्यान बस सुविधा

  • मुलीना सायकल वाटप

  • बालभवन - विज्ञान केंद्र स्थापन

  • आरोग्य तपासणी व औषधोपचार

  • महिलेला बुडीत मजुरी देणे

  • माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करणे

  • गौण वनोपजांचा उपभोग घेण्यासाठी अर्थ सहाय्य

तालुक्यातील मोठया गावातील माध्यमिक शाळेत अभ्यासिका सुरु करणे.
अधिक माहिती

या योजने अंतर्गत तालुक्यातील ज्या गांवामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. अशा ठिकाणी इ. 8 वी ते इ.12 वी च्या विद्यार्थ्यांकरीता माध्यमिक शाळेच्या 1-2 खोल्यांमध्ये अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत.. या अभ्यासिकेमध्ये सोलर लाईटची व्यवस्था करण्यात आली असुन इ. 8 वी ते इ.12 वी च्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचे 8/10 संच तसेच इतर पुरक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत तसेच सदर पुस्तके ठेवण्यासाठी कपाट/ रॅक इत्यादी साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. जिल्हयात अशा एकुण 171 अभ्यासिका सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी सन 2018-19 मध्ये 166 अभ्यासिकांसाठी व्यवस्थापक व सेवक यांच्या मानधन व इतर खर्चा करीता रुपये 14.94 लक्ष इतक्या रक्कमेची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सन 2018-19 या वर्षात 5084 विद्यार्थी अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत.

बस ट्रॅकिंग सिस्टम (Username: mvpublic , Password: mvpublic)